Mane Livestock farming Pvt Ltd in Maharashtra India Poultry Fish Goat Dairy Farming Project Development All Agriculture farming sarvice पशुधन शेती ने खास तुमच्यासाठी... कुकुट पालन Poultry Farming मत्स्यव्यवसाय Fish farming शेळीपालन Goat farming दुग्ध व्यवसाय Dairy farming या सर्वांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आली आहे Mane Livestock Farming Pvt Ltd
Friday, 15 May 2020
🤝🏻 Partnership Opportunity 🤝🏻🐓🐥🐣Poultry Contract Farming👉 Be a Partner with India's Leading Business Group "Mane Farms Group of Companies" & Earn Money through our various Business Opportunities√ Assured Return on Investment√ Higher Returns√ Long Term Contract√ No Sale - Purchase√ No Full Investment, Just a Small given link of our website for Our Poultry Contract Farming Schemes. Check Complete information, minimum criteria and your eligibility for the scheme. There is no provision of buying or selling anything in any of our poultry contract farming schemes, Farmer need to care of birds only.Our Company Approves Applications and farms after inspection, if found suitable with any of our quality standards. As our Farming method, Breed, Feed, Antibiotics etc. are different from India and Unique. It is for Export, Not for Indian Market.👉 If any question you can contact to Our via 24x7 Customer Chat Support Executive on Whatsapp no. 9172594143
Sunday, 10 May 2020
उन्हाळ्यात जनावरांची काळजी लाळ्या खुरकूत रोगाची लक्षणे प्रतिबंधक उपाय उष्माघात लक्षणे प्रथमोपचार जनावरांची काळजी वासरांचे संगोपन 9075001430, Mane Livestock Farming Pvt Ltd, Mane Livestock Farming Pvt Ltd Laxman Mane Poultry fish goat dairy farming project development All agriculture services Project Development 9172594143,
उन्हाळ्यात जनावरांची काळजी
लाळ्या खुरकूत
हा आजार अत्यंत सूक्ष्म विषाणूंमुळे सर्व वयाच्या जनावरांमध्ये होतो. रोगाची लागण झालेल्या जनावराच्या श्वासावाटे, लाळेतून व नाकातील स्रावातून विषाणू हवेच्या सान्निध्यात येतात, धूलिकणांवर बसतात. ऊस गळीत हंगामाच्या सुरवातीस व हंगाम संपण्याच्या वेळी लागण झालेल्या बैलामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना रोगाचा प्रसार होतो. निरोगी आणि लागण झालेली जनावरे एकमेकांच्या संपर्कात जनावरांच्या बाजारात येतात, त्यामुळे साथीचा झपाट्याने प्रसार होतो.रोगाची लक्षणे
संकरित जनावरांमध्ये रोगाची तीव्र लक्षणे दिसून येतात, तर देशी जनावरांमध्ये सौम्य लक्षणे आढळतात. जनावरास 105 ते 106 अंश फॅ.पर्यंत ताप असतो. तोंड, जीभ, हिरड्या यांच्यावर व्रण पडतात, चिरा पडतात, कधी कधी जिभेचे तुकडेदेखील पडतात, त्यामुळे जनावरास खाता येत नाही. पायावरील जखमांमुळे जनावर लंगडते, दूध कमी देते किंवा देतच नाही व शेतकऱ्यांचे फारच आर्थिक नुकसान होते. वासरांमध्ये या रोगाच्या विषाणूंची हृदयाच्या झडपा आणि हृदयाची आवरणे यामध्ये झपाट्याने वाढ होते व लक्षणे दिसावयाच्या आतच वासरे मृत्युमुखी पडतात. गाय गाभण राहण्यास त्रास पडतो. सडांवर व्रण पडतात. काससुजी हा आजार उद्भवतो. बैल आजारानंतर बराच काळ गाडीस चालू शकत नाहीत, धापा टाकतात, उन्हात मेहनतीचे काम करू शकत नाहीत व शेतकऱ्यांचे सर्वतोपरी आर्थिक नुकसान होते.प्रतिबंधक उपाय
आजारामुळे जनावर निकामी होण्याऐवजी रोगप्रतिबंधक लस जनावरास टोचणे फायदेशीर ठरते. सर्व संकरित व देशी जनावरांना वर्षातून दोन वेळा ऑक्टोबर - नोव्हेंबर आणि मार्च - एप्रिल महिन्यांत लस देऊन घ्यावी. तज्ज्ञांकडून जनावरांचे योग्य वेळी लसीकरण करावे.जनावराच्या तोंडातील व पायांवरील जखमा पोटॅशियम परमॅंगनेट किंवा तुरटी किंवा खाण्याचा सोडा यांच्या सौम्य द्रावणाने धुऊन तोंडातील जखमांवर हळद लावावी. पायांवरील जखमा स्वच्छ करून त्यावर माश्या बसू नयेत, जखम चिघळू नये म्हणून जंतुनाशक मलम लावावे; तसेच पशुवैद्यकाची मदत घेऊन वेळ वाया न घालवता औषधोपचार करावेत.
उष्माघात
उन्हाळ्यात होणारा दुसरा व अत्यंत महत्त्वाचा आजार म्हणजे उष्माघात होय. उन्हाळ्यात ज्या भागांत तापमान 45 अंश ते 46 अंश से.वर जाते, उष्णतेची लाट येते, त्या भागांत साधारणतः महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा व खानदेश या भागात हा आजार उद्भवतो. जनावरांच्या गोठ्यात प्रमाणापेक्षा जास्त आर्द्रता आणि वायुविजनाची योग्य सोय नसणे; तसेच जनावरांची गर्दी, बैलांना भर उन्हात खूप अंतर ओढायला लावल्यास, घोड्यास भरधाव वेगाने उन्हात पळविल्यास, जनावरांची वाहतूक करताना वाहनात गर्दीने जनावरे भरून त्यांना वेळोवेळी पाणी न पाजल्यास किंवा जनावरे उन्हात बांधल्यास उष्माघात होण्याची दाट शक्यता असते.लक्षणे
या रोगामुळे भयंकर अशक्तपणा येतो, डोळे खोल जातात, तोंडास कोरड पडते, जनावर तोंडाचा "आ' वासते, तोंड उघडे ठेवते, जोरजोराने श्वासोच्छ्वास करते, धाप लागते, नाडी जलद चालते, शरीराचे तापमान 110 अंश फॅ.पर्यंत वाढते. कुत्र्यांमध्ये आणि घोड्यांमध्ये उलट्या होतात. जनावर एक टक लावून पाहते. घोड्याच्या सर्व अंगास दरदरून घाम फुटतो, अंग ओलेचिंब होते. जनावर त्वरित उपचार न केल्यास दगावते.प्रथमोपचार
जनावर उन्हात असल्यास ताबडतोब झाडाच्या सावलीत थंड ठिकाणी न्यावे. जनावराच्या अंगावर बर्फाचे थंड पाणी शिंपडावे. शरीराचे तापमान हळूहळू उतरेल याची काळजी घ्यावी.जनावरांची काळजी
जनावरे उन्हात बांधू नयेत. बांधण्याच्या जागी आर्द्रतेचे प्रमाण जास्त असू नये. जागा हवेशीर असावी. हवा खेळती ठेवावी. घराचे छप्पर पांढऱ्या रंगाचे असावे, त्यामुळे प्रखर उष्णतेच्या किरणांचे परावर्तीकरण होऊन गोठा थंड राहण्यात मदत होईल. गोठ्यात जनावरांची गर्दी असू नये. संपूर्ण दिवस व रात्र थंड व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जनावरांना गुळाचे पाणी पाजावे.वासरांचे संगोपन
संपर्क (लेखक क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)
दुधाळ जनावरांसाठी आहार animal feeding percentage MANE LIVESTOCK FARMING PVT. LTD, 9172594143
दुधाळ जनावरांसाठी आहार
दुधाळ जनावरांसाठी समतोल आहार
1) समतोल आहारामध्ये ओली वैरण, कोरडी वैरण आणि अंबोण यांचा योग्य प्रमाणात वापर महत्त्वाचा आहे. जनावरांना हिरवी वैरण देताना एकदल आणि द्विदल वर्गातील चाऱ्याचे मिश्रण करावे. एकदल वर्गातील चाऱ्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, पॅरा गवत, नेपियर गवत, धारवाड हायब्रीड नेपिअर-6 इत्यादींचा समावेश होतो. एकदल चाऱ्यामध्ये प्रथिने कमी प्रमाणात आणि पिष्टमय पदार्थ अधिक असतात. चवळी, लसूण, बरसिम, स्टायलो, दशरथ गवत ही द्विदल वर्गातील चारापिके आहेत. द्विदल चारा अधिक पौष्टिक असतो. यामध्ये प्रथिने आणि कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.
2) सुक्या चाऱ्यामध्ये गव्हाचे काड, ज्वारीचा कडबा, भाताचा पेंडा, मिश्र सुका चारा जनावरांच्या आहारात द्यावा. या चाऱ्यांचा उपयोग मुख्यत्वे करून पोटभर वैरण म्हणून केला जातो. ही वैरण कमी पौष्टिक असते.
3) समतोल आहारामध्ये अंबोण महत्त्वाचे आहे. यामध्ये प्रथिने आणि ऊर्जा यांचे प्रमाण अधिक असते. अंबोण मिश्रणाचा 100 किलो तत्त्वावर नमुना बनवावा. जनावरांना ऊर्जा पुरविण्याकरिता अंबोणामध्ये मका, ज्वारी, बाजरी यांसारखी तृणधान्ये वापरली जातात. प्रथिनांचा स्रोत म्हणून सरकी, भुईमूग, जवस, तीळ, सूर्यफूल, खोबऱ्यापासून मिळणारी पेंड वापरण्यात येते. याचबरोबरीने भात किंवा गव्हाचा कोंडा, भाताचे पॉलिश, तूरचुणी, उडीद चुणी, मूग चुणीचा समावेश होतो.
4) पशुखाद्यात दोन टक्के खनिज मिश्रण, एक टक्का चुना पावडर आणि एक टक्का मिठाचा समावेश करावा.
5) पशुखाद्यात साधारणतः 25 ते 35 टक्के पेंड, 25 ते 35 टक्के तृणधान्य, 25 ते 45 टक्के तृणधान्यापासून आणि 20 ते 30 टक्के कडधान्यापासून मिळणारे दुय्यम पदार्थ, एक ते दोन टक्के खनिज मिश्रण आणि एक टक्का मीठ याचा समावेश होतो.
6) दुभत्या जनावरास पशुखाद्य देण्याचे प्रमाण त्यांच्या दुग्धोत्पादनावर अवलंबून असते. दुधाळ गाईस एक ते 1.5 किलो पशुखाद्य शरीर पोषणासाठी आणि एक किलो अंबोण प्रति 2.5 किलो दुग्धोत्पादनासाठी द्यावे. दुधाळ म्हशींना प्रति किलो दुग्धोत्पादनासाठी लागणारे अन्नघटक गाईंना लागणाऱ्या अन्नघटकांपेक्षा अधिक असतात. याचे कारण म्हणजे म्हशींच्या दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण गाईच्या दुधापेक्षा जास्त असते.
7) अंबोण जनावरास देण्याअगोदर आठ ते 12 तास भिजून ठेवावे म्हणजे ते रुचकर होते, त्याची पाचकतादेखील वाढते. अंबोण हा घटक खर्चिक असल्यामुळे अंबोणाची बचत केल्यास दुग्धोत्पादन अधिक किफायतशीर होते.
8) साधारण 10 लिटर दूध देणाऱ्या गाईस 15 ते 20 किलो द्विदल हिरवा चारा, दोन ते तीन किलो मका भरडा, दोन ते चार किलो सुका चारा दिल्यास तिच्या अन्नघटकांच्या गरजा पूर्ण होतात.
9) आहारातील अंबोणाचा भाग गाई, म्हशींना दूध काढते वेळी द्यावा. हिरवा चारा दूध काढल्याबरोबर आणि कडबा, गव्हाचे काड, सरमाड सारखा सुका चारा कोणत्याही वेळेस दिल्यास हरकत नाही.
Friday, 8 May 2020
म्हशींच्या जाती मुऱ्हा मेहसाणा पंढरपुरी सुरती Dairy Farming 9172594143
- म्हशींच्या जाती
- म्हशींच्या जाती
दुग्धोत्पादनासाठी म्हशीच्या मुऱ्हा, मेहसाणा, पंढरपुरी, सुरती या जाती चांगल्या आहेत. निवड पद्धतीने म्हशीमध्ये सुधारणा करणे शक्य आहे. गोठ्यामध्ये मिळणाऱ्या म्हशींच्या पिढ्यांची वाढ करणे फायद्याचे ठरते.
मुऱ्हा
शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. एका वेतातील दुधाचे प्रमाण 3000 ते 3500 लिटर असते.
मेहसाणा
ही जात सुरती व मुऱ्हा जातींच्या संकरापासून निर्माण झाली असून, शरीर वैशिष्ट्ये मुऱ्हा जातीशी मिळतीजुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी 3000 लिटरपर्यंत दूध देतात.
पंढरपुरी
सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम, पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत. म्हशींचे वजन साधारण 400 किलो असते. पारड्या वयाच्या 25 ते 30 महिन्यांत गाभण राहतात आणि 35 ते 40 महिन्यांत पहिल्यांदा वितात. मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकडकाळ, पहिल्या वेताचे कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य या गुणांमुळे दुधासाठी ही जात चांगली आहे. हे सर्व गुण एकत्रितपणे इतर जातींत आढळत नाहीत. या म्हशी एका वेतात 1500 ते 1800 लिटर दूध देतात.
सुरती
शरीरबांधा मध्यम, कान लांबट, रुंद व शिंगांनी झाकलेले असतात. भुवयांचे केस पांढरे, डोळे मोठे व शिंगे मध्यम व विळ्याच्या आकाराची असतात. शरीराचा रंग भुरा व मानेवर ठळक पांढरे आडवे पट्टे असतात. एका वेतातील दुधाचे उत्पादन 1800 लिटर असते. जास्त काळ दूध देते. दुधात स्निग्धांश जास्त प्रमाणात असतात.
टर्की संवर्धन / पालन कोंबडीच्या पिल्लाच्या तुलनेत टर्कीच्या गरजा उर्जा, प्रथिने, व्हिटॅमिन आणि खनिजे ह्या उच्च आहेत. दोन्ही लिंगांसाठी...
