Sunday, 10 May 2020

शेळी-मेंढीच्या जाती उस्मानामाबादी शेळी - संगमनेरी शेळी - माडग्याळ मेंढी - पैदाशीसाठी नराची निवड Mane Livestock Farming Pvt Ltd Laxman Mane Poultry fish goat dairy farming project development All agriculture services Project Development 9172594143

शेळी-मेंढीच्या जाती

 

राज्यातील शेळ्या व मेंढ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली शेळीची जात आहे. मेंढ्यांमध्ये लोकर व मांसोत्पादनासाठी दख्खनी मेंढी आणि फक्त मांसासाठी मडग्याळ मेंढी फायदेशीर आहे. या सर्व जाती महाराष्ट्रातील दुष्काळप्रवण भागांत अत्यंत कमी व निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यावर तग धरून राहतातच, शिवाय त्यांची रोगप्रतिकारक क्षमताही चांगली आहे.

उस्मानामाबादी शेळी -

या शेळीत जुळी करडे देण्याचे प्रमाण 60 टक्के आहे. निवड पद्धतीने जुळी करडे देणाऱ्या शेळ्या निवडाव्यात. ही जात मटणासाठी चांगली आहे.

संगमनेरी शेळी -

या शेळ्या रंगाने पांढऱ्या किंवा पांढरट तपकिरी असतात. या शेळीत जुळी करडे देण्याचे प्रमाण 40 ते 50 टक्के आहे. ही जात दूध आणि मांसासाठी वापरली जाते.

माडग्याळ मेंढी -

या मेंढीची शरीरवाढ चांगली आहे. मेंढीच्या कोकराचे जन्मतः वजन तीन ते पाच किलो असते. तीन महिने वयाच्या वेळचे वजन 22 किलो होते. पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचे वजन 45 ते 50 किलो इतके असते. या मेंढ्याच्या अंगावर लोकर कमी असते.


पैदाशीसाठी नराची निवड -


नर हा कळपातील सुदृढ व त्या त्या जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा. पैदाशीचा नर चपळ असावा. पैदाशीचा नर निवडताना दोन जुळ्या नरांतील एक चांगला नर निवडावा, म्हणजे पुढील पिढ्यांत जुळे व तिळे करडे देण्याचे प्रमाण वाढते. पैदाशीच्या नराची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी, जेणेकरून एका दिवशी जास्तीत जास्त माद्यांना गर्भधारणा करण्यास तो सक्षम ठरेल. नराचे अंडकोश मोठे व पोटाला चिकटलेले असावे. पैदाशीचा नर उंच, लांब, भरदार छाती असणारा व मानेवर आयाळ असणारा असावा. पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे. पैदाशीचा नर जातिवंत माता-पित्यापासून झालेला असावा. नर निवडताना दीड ते दोन वर्षांचा निवडावा. पैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा, म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल. साधारणपणे दीड ते दोन वर्षांच्या नराला 30 शेळ्या / मेंढ्यांच्या पैदाशीला वापरावे. दर दोन वर्षांनी नर बदलावा. हा बदल करताना शक्‍यतो दुसरा नर लांब अंतरावरून आणावा, म्हणजे सकुळ प्रजननास आळा बसून वाईट परिणाम होणार नाहीत. 

संपर्क - 
1) 02426 - 243455 
वरिष्ठ शास्त्रज्ञ, संगमनेरी शेळी संशोधन योजना 
2) 02426 - 294225 
सर्वसमावेशक दख्खनी मेंढी प्रकल्प, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

 

संदीप गाढे, नांदेड, वसंत शेळके, संगमनेर, जि. नगर

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

No comments:

Post a Comment

टर्की संवर्धन / पालन कोंबडीच्‍या पिल्‍लाच्‍या तुलनेत टर्कीच्‍या गरजा उर्जा, प्रथिने, व्हिटॅमिन आणि खनिजे ह्या उच्‍च आहेत. दोन्‍ही लिंगांसाठी...